पुढारी

1.2M Followers

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी सात दिवसच होम क्वारंटाईन करणार

24 Jul 2020.01:39 AM

मुंबई : संजय कदम

मुंबईकर चाकरमान्यांनी गौरी गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात कोकणात जाण्यास इच्छु क असून या चाकरमान्यांना चौदा दिवसा ऐवजी सात दिवसाचा होम क्वारंटाईन कालावधी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होणार आहे.

कोकणातील खासदारांनी मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी भेट घेवून या निर्णयासाठी आग्रह केला होता. या मध्ये खासदार विनायक राउत, खासदार अरविंद सावंत हे या वेळी उपस्थित होते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांबाबत सद्या कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने कोकणवासीय. अस्वस्थ आहेत. यापार्श्वभूमीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि खासदार यांनी आग्रही भूमीका घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सात दिवसांच्या क्वारंटाईनला मान्यता देताना वैद्यकिय दाखले असणे आवश्यक केले आहे. लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत बैठका घेऊन आढावा घेतला गेला असला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेणार आहेत. होम क्वारंटाईनचा कालावधी, ई पास आणि एसटी-रेल्वेची सेवा याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे चाकरमानी संभ्रमात आहेत.

तर सिंधूदुर्गात अतिउत्साही ग्रामपंचायतींनी 14 दिवस आगोदर न येणार्‍या दंड लावणार असल्याची घोषणा केली आहे, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाकडे डोळे लागले आहेत. क्वारंटाईनच्या कालावधीवरुन सद्या वातावरण चांगलेच तापले आहे. सरकार काहीही निर्णय घेवो, पण 14 दिवसाचा क्वारंटाईनचा कालावधी आम्ही कमी करणार नाहीत अशी भूमिका कोकणातील काही ग्रामपंचायतींनीघेतली आहे तर हा कालावधी फक्त सातच दिवसांचा असावा अशी जोरदार मागणी चाकरमान्यांकडून होऊ लागली आहे.

त्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींवरही मोठा दबाव आणला जात आहे. अंशतः उठलेला लॉकडाऊन, त्यामुळे सुरू झालेली कार्यालये, चार महिन्यानंतर हाताला मिळालेलं काम अशी स्थिती असताना 14 दिवस होम क्वारंटाईन आणि गणपतीचे सात दिवस इतकी मोठी सुट्टी कशी मिळणार असा प्रश्न चाकरमान्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच क्वारंटाईनचा कालावधी सात दिवसच करावा असा आग्रह धरला जात आहे. चाकरमान्यांच्या या वाढत्या दबावामुळे क्वारंटाईनचा कालावधी सात दिवसांचा करण्याबाबत शासन स्तरावरही सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

गणेशोत्सवासंदर्भातली नियमावली सरकारने जाहीर केली असली तरी कोकणातील चाकरमान्यांसाठी मात्र काही वेगळे निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले. दरवर्षीप्रमाणे कोकणात जाण्यासाठी टोलमाफीचाही निर्णय घेतला जाणार आहे. सरकार कधी निर्णय घ्यायचा तो घेईल पण चाकरमान्यांनी मात्र 'गणपतीक गावी जायची' जोरदार तयारी सुरू केली आहे. आयत्यावेळी अडचण नको म्हणून त्यांनी खासगी वाहनाचा पर्याय निवडला आहे. परंतु या मार्गातही त्यांना ई-पासची अडचण येत आहे.

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Pudhari

#Hashtags