सकाळ

1.4M Followers

मिठाईवर 'बेस्ट बिफोर'चा उल्लेख हवाच!

27 Sep 2020.5:03 PM

पुणे : दाण्याचे लाडू असो की, बर्फी या आणि अशा प्रकराच्या प्रत्येक मिठाईच्या लेबलवर 'बेस्ट बिफोर' ठळकपणे नमूद करण्याचे बंधन 'अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकारण'ने (एफएसएसआय) घातले आहे. येत्या गुरुवारपासून (ता. 1) याची अंमलबजाणी देशभर सुरू होईल.

आपण मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर त्यांच्या समोरील ट्रेमधून पदार्थ घेतला जातो. त्याचे वजन करून मिठाईचे पॅकिंग करून आपल्या हातात दिला जातो. पण, आतापर्यंत यावर कधी हे "बेस्ट बिफोर' हे प्रसिद्ध केले जात नव्हते. हा पदार्थ किती दिवसापर्यंत चांगला राहू शकतो, हे त्यातून नेमकेपणाने ग्राहकांना कळत नव्हते. त्यासाठी हा नवा आदेश लागू करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पोटात जाणारा अन्नचा प्रत्येक घास सुरक्षितच असला पाहिजे, असा आग्रह आता धरला जात आहे. त्यासाठी हा आदेश दिला आहे.

देशातील अनेक दुकानांमधुन गोड पदार्थांची कोणतेही पॅकेजिंग न करता विक्री होते. त्यावर लेबल नसते. काही दुकानांमधुन छोट्या प्लॅस्टिक बॉक्‍समध्ये गोड पदार्थांचे पॅकेजिंग करून विक्रीसाठी उपलब्ध केले जाता. त्यावर ते अन्न पदार्थ नेमका दिवसांपर्यंत चांगले (बेस्ट बिफोर) याची उल्लेख नसतो. या नव्या आदेशाप्रमाणे उत्पादकांना अन्न पदार्थाच्या लेबलवर "बेस्ट बिफोर'चा उल्लेख करणे बंधनकारक होणार आहे.

या आदेशामुळे ग्राहकांना खुल्या मिठाईची मुदत नेमकेपणाने कळेल. त्यामुळे आपण ही मिठाई किती दिवसांपर्यंत खाऊ शकतो, तसेच ती दुकानदाराने कधी तयार केली आहे, याची माहिती ग्राहकांना मिळावी असा यामागचा उद्देश असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातील (एफडीए) अधिकाऱयांनी दिली.

याबाबत एफडीए आयुक्त अरूण उन्हाळे म्हणाले, "मिठाईच्या दुकानांमधून उघड्यावर होणारी अन्नपदार्थांची विक्री या नवीन आदेशामुळे थांबण्यास मदत होईल. मिठाईच्या दुकानांमधील ट्रेसमोर त्या पदार्थाची मुदतीची तारीख (एक्‍सपायरी डेट) आता द्यावी लागणार आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्यात येईल.''

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Sakal

#Hashtags