Careerनामा

108k Followers

MPSC Mains | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास 4 महिन्यात कसा करावा?

14 Apr 2021.8:34 PM

करिअरनामा ऑनलाइन – कोरोना मुळे संयुक्त पुर्व परीक्षा पुढे गेली आहे , प्रस्तावित वेळापत्रक नाही , पुढील काळ अनिश्चित आहे या काळाचा MPSC परीक्षार्थींनी सदुपयोग करून घ्यावा. जेणेकरून येणार्या काळात पद मिळणे सोपे होईल
२१ मार्च ची राज्यसेवा उत्तीर्ण व्हायची शाश्वती असलेल्या परीक्षार्थींनी मुख्य ची तयारी एव्हाना सुरू केलीच असेल पण बाकी परीक्षार्थींनी पण राज्यसेवा मुख्य सुरू करावी.
पुढील ४ महीने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास का करावा ??
1. राज्यसेवा मुख्य अभ्यासक्रमा मध्ये साधारणतः राज्यसेवा पुर्व आणि इतर परीक्षांच्या मुख्य चा अभ्यास पुर्ण होतो.
2.राज्यसेवा मुख्य चा अभ्यास पुर्ण केल्यास‌ पुढील पुर्वची शाश्वती वाढेल.
3. मुख्य चा आवाका लक्षात येऊन अधिकाधिक प्रश्न सरावासाठी वेळ मिळेल.

4. विषय निहाय अधिकच्या उपघटकांसाठी नोट्स काढण्यास हा वेळ चांगला आहे.
5.आता पासुन उजळणीस अधिक वेळ मिळेल. हा वेळ सत्कारणी लागेल.

राज्यसेवा मुख्य अभ्यास क्रम घटक आणि पुढील 4 महीने(15 April ते 15 August) यासाठी अंदाजे पुढीलप्रमाणे वेळापत्रक तयार करता येईल –

प्रत्येक महिन्यात 26 दिवस अभ्यास
04 दिवस उजळणी(दर रविवारी)

दररोजचा दिनक्रम कसा असावा ? –
1 तास मराठी/इंग्रजी +
1 तास चालु घडामोडी +
1 तास PYQ विश्लेषण आणि/किंवा सराव
किमान 3 तास GS एक विषय घटक
किमान 3 तास GS दुसरा विषय घटक
किंवा 6-8 तास GS एकच विषय घटक

मराठी आणि इंग्रजी तयारी कशी करावी ? –
A. वस्तुनिष्ठ (व्याकरण + उतारा + शब्द )
पहीला 1 महीना दररोज एक घटक तास द्यावा.
संबंधित घटकाचे PYQ विश्लेषण करीत रहावे
(एक दिवस आड मराठी/इंग्रजी )
नंतरचे महीने उजळणी, प्रश्न सराव .

B. वर्णानात्मक –
दररोजच्या वृत्तपत्र वाचाताना निबंधाच्या तयारीसाठी मुद्दे,लेखन शैली, शब्दसंग्रह, सारांश लेखन आणि भाषांतर यासाठी उपयोजन करण्याचा दैनंदिन सराव करावा.
संबंधित घटकाचे PYQ विश्लेषण करीत रहावे
दर रविवारी एक निबंध , सारांश लेखन आणि भाषांतर सराव करावा.

सामान्य अध्ययन (GS) 1 ते 4 चे घटक 120 दिवसात पुढीलप्रमाणे करता येतील ??

टप्पा 1 (15 एप्रिल ते 15 मे )
A. इतिहास(1.1.1 ते 1.1.13)
B. राज्यघटना(2.1)
C.संघराज्य व्यवस्था(2.2.अ), राजकीय व्यवस्था (2.2.ब), राज्य शासन व प्रशासन(2.4)

टप्पा 2 (16 मे ते 15 जुन )
A. अर्थव्यवस्था (4.1.1ते 4.1.5, 4.2.1 ते 4.2.9)
B. मानवी संसाधन विकास (3.1.1 ते 3.1.5 )
C. लोकसंख्या भुगोल(1.2.5)

टप्पा 3 (16 जुन ते 20 जुलै)
A.भुगोल (1.2.1 ते 1.2.4)
B.कृषी(4.2.10 ते 4.2.11)(1.3.1ते 1.3.3)
C.पर्यावरण (1.2.6)
D.अवकाश/अंतराळ तंत्रज्ञान आणि दूर संदेशवहन(1.2.7 ते 1.2.8)
E. विज्ञान आणि तंत्रज्ञान (4.3.1 ते 4.3.6)

टप्पा 4 ( 21 जुलै ते 15 ऑगस्ट )
A. मानवी हक्क (3.2.1 ते 3.2.13 )
B.कायदे, प्रशासन (2.3, 2.6), पंचायत राज(2.5), 2.7 ते 2.20

वरील वेळापत्रक दिवस आणि घटक यानुसार दिलेलं आहे, परंतु परीक्षार्थींच्या कम्फर्टझोन नुसार काही घटकांना जास्त किंवा कमी वेळ लागु शकतो, तरी आपापल्या सोयीनुसार कमी जास्त दिवसात बदल करुन घ्यावा तसेच
नंतर संयुक्त गट ब पुर्व , वनसेवा पुर्व आणि राज्यसेवा मुख्य परीक्षांच्या तारखांनुसार दिनक्रमात आपापल्या प्राधान्याने बदल करुन घ्यावा.

संयुक्त पुर्व गट ब फोकस असलेल्यांनी – गट ब पुर्व च्याच अभ्यास आणि उजळणी वरच भर द्यावा

राज्य सेवा व गट ब दोन्ही करणार्यांनी – पुढील तारखा येईपर्यंत १. राज्यसेवा मुख्य २. गट ब पुर्व ३. गट ब मुख्य वरील तीन्ही मधील “समान घटक” करायला घ्या.

A.समान घटकांसोबत आपापले कच्चे घटक आता वेळ देऊन पक्के करा, हा वेळ तुम्हाला मिळालेली अजुन एक शेवटची संधी आहे असं समजा.
B.राज्यसेवा पूर्व किंवा गट ब पुर्व बाबत उत्तीर्ण व्हायची शाश्वती असणार्यांनी राज्यसेवा मुख्य आणि गट ब मुख्य च्या अभ्यासक्रमातील समान घटक (उदा.अर्थव्यवस्था/राज्यव्यवस्था/मराठी/इंग्रजी) करायला घ्या.

इतर महत्त्वाचे –
१. अभ्यास अभ्यासक्रम घटक >PYQ विश्लेषण > योग्य संदर्भ ग्रंथ> प्रश्न सराव > शंका निरसन >उजळणी अशा क्रमाने अभ्यास करणे अपेक्षित आहे.
२. महत्वाचे संदर्भ साहित्य वगळता इतर उपघटकांच्या नोट्स काढुन ठेवाव्यात . उजळणी साठी सोप्या पडतील.

आपण GS पेपर घटकानुसार संदर्भ साहित्य आणि रणनीती यावर पुढील लेखात विस्तृत चर्चा करु.

विशेष सूचना –
वरील नियोजन अंतिम नाही, तुमचं वैयक्तिक वेगळं नियोजन असु शकतं, ते तयार असेल तर त्याची अंमलबजावणी करा.

पण नियोजन “महत्त्वाचें” आहे. Benjamin Franklin म्हणतात ” By failing to prepare, you are preparing to fail.”

-नितिन बऱ्हाटे
easywaytoupsc@gmail.com
(लेखक “लोकनीति IAS, मुंबई”चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: CareerNama

#Hashtags