सनातन प्रभात मराठी

24k Followers

मंगलम् कापूर'च्या विज्ञापनामध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान !

13 Sep 2021.6:45 PM

  • हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍या उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालावा ! - संपादक
  • अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांचा वापर करून विज्ञापन बनवण्याचे धारिष्ट्य मंगलम् कापराची निर्मिती करणार्‍या आस्थापनाने दाखवले असते का ? हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यामुळेच अशा प्रकारे विविध माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जातो ! - संपादक

मुंबई - 'कलर्स' या मनोरंजन वाहिनीवर 'मंगलम् कापूर'चे विज्ञापन प्रसारित होत आहे.

या विज्ञापनामध्ये श्रीरामाचे मानवीकरण करण्यात आल्याने कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. 'हे विज्ञापन मागे घेऊन हिंदूंची क्षमा मागावी', अशी मागणी करण्यात येत आहे.
हे विज्ञापन रियान मेनडोन्का यांनी 'यु ट्यूब'वर पोस्ट केले आहे. या विज्ञापनामध्ये श्रीरामाच्या वेशभूषेत असलेल्या तरुणाला त्याच्या भ्रमणभाषवर आईचे छायाचित्र दिसते. तेव्हा त्याला अचानक आईने त्याला कापूर आणायला सांगितल्याचे आठवते. नंतर श्रीरामाच्या वेषातील तरुण एका दुकानामध्ये जातो आणि दुकानदाराकडे कापूर मागतो. तेव्हा दुकानदार पूजा करत असतो. दुकानदाराचा नोकर त्याला साधारण कापूर आणून देतो. तेव्हा दुकानदाराचे लक्ष तरुणाकडे जाते. 'साक्षात् श्रीराम कापूर मागत आहे', असे वाटून दुकानदार नोकराने दिलेला कापूर फेकून देतो आणि तिजोरीतून 'मंगलम् कापरा'ची डबी काढून श्रीरामाच्या वेषातील तरुणाच्या हातात देतो अन् नमस्कार करतो.

धर्माभिमानी हिंदूं पुढील संपर्कावर करत आहेत विरोध !

मंगलम् ऑर्गनिक्स लिमिटेड

मुंबई ४०००२१
दूरभाष : (०२२) ४९२०४०८९
इमेल : [email protected], [email protected]

लिंक : https://www.youtube.com/watch?v=85wPbUU8Tm4

हे विज्ञापन 'कलर्स मराठी' या दूरचित्रवाहिनीवर प्रसारित केली जात आहे.

कलर्स मराठी

दूरभाष : ९१ (०२२) ६९०८ १८१८
इमेल : feedbackcolorsmarathi.com
ट्विटर : https/twitter.com/ColorsMarathi/

'देवतांचे विडंबन रोखण्यासाठी संयत मार्गाने विरोध करा'
Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Sanatan Prabhat Marathi

#Hashtags