सरकारनामा

280k Followers

आर्यन खानला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न! एनसीबीनं वानखेडेंवर फोडलं खापर

28 May 2022.3:30 PM

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्लिनचिट देण्यात आली आहे.

त्याच्याविरोधात तपासात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. याप्रकरणात काही त्रुटी आढळून आल्याची कबुली अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) दिली आहे. त्यानंतर आता एनसीबी मुंबईचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) अडचणीत आले आहेत. एनसीबीनं या संपूर्ण प्रकरणाचं खापर वानखेडेंवर फोडलं आहे. (Sameer Wankhede News)

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यामुळं एनसीबीनं वानखेडेंकडून हा तपास काढून घेतला होता. या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आलं होतं. आता या एसआयटीचा अहवाल उघड झाला आहे. यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एसआयटीच्या अहवालात म्हटलं आहे की, तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कशाही प्रकारे आर्यन खानला अडकवायचं होतं. ड्रग्ज ज्या व्यक्तीकडं सापडत नाही, अशा व्यक्तीला न्यायालय नेहमी दिलासा देतं. याचबरोबर पुरेसा पुरावा नसलेल्या व्यक्तींबाबतही न्यायालय कठोर भूमिका घेत नाही. मात्र, तपास अधिकारी जाणीवपूर्वक काही गोष्टी करीत आहेत, हे निदर्शनास आल्यानंतर न्यायालय याबद्दल प्रश्नही उपस्थित करते. तपास अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाईल जप्त केला. यासाठी कोणत्याही प्रक्रियेचे पालन केलं नाही. त्या मोबाईलमधील डेटा आणि व्हॉट्सअॅप चॅटही काढून घेण्यात आले.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणचा संशयास्पद तपास आणि जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करणे या दोन्ही गोष्टींमुळे वानखेडे अडचणीत आले आहेत. याची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालायने घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी तोंडघशी पडली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरवातीला वानखेडे यांच्याकडे होते. तसेच, वानखेडेंनी नोकरी मिळवण्यासाठी खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोपही झाला आहे. यामुळे वानखेडेंच्या मागे ही चौकशी आता लागली आहे.

चंद्रकांतदादा अडचणीत! रुपाली चाकणकर 'अॅक्शन मोड'वर

समीर वानखेडे यांनीची क्रूझवरील डॅग्ज पार्टीवर छापा टाकून कारवाई करत आर्यन खानसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले. आर्यन खानला अडकवले जात असल्याचेही त्यांनी म्हटलं होते. अखेर त्यांनी केलेल्या या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झालं आहे. आर्यनला एनसीबीने क्लिनचिट दिल्यानंतर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला. सॉरी, सॉरी म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला. मी आता एनसीबीमध्ये नाही. त्यामुळे याप्रकरणावर बोलू शकत नाही. यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांशी बोला, असे वानखेडे म्हणाले आहेत.

आर्यन खानला क्लिनचिट मिळताच मुकुल रोहतगी म्हणाले...

दरम्यान, 'एनसीबी'चे उपमहासंचालक संजयसिंह यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यांनी यासाठी तीन कारणे दिली आहेत. त्यानंतर आर्यन खानला क्लिनचिट देण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्यन सुटण्याची ही आहेत तीन महत्वाची कारणे :

1. सुरूवातीलाच आर्यनच्या ज्या मित्राकडे चरस सापडले होते. त्याच्या जबाबात स्पष्टपणे आले आहे की, ते आर्यनसाठी नव्हते. आर्यनने त्याला सांगितले होते की, ड्रग्ज घेऊ नको, एनसीबी सतर्क आहे, असं त्या मित्राच्या जबाबात आले होते.

2. आर्यन खानच्या व्हॉट्स अॅप चॅट बाबतही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्या चॅटमध्ये या केसचा संबंध नाही.

3. आर्यनने ड्रग्ज घेतल्याचा आरोप होता. पण त्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणीच करण्यात आली नाही. या तीन महत्वाच्या गोष्टी तपासात आढळून आल्या आहेत. त्यामुळे आर्यनविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याचे संजय सिंह यांनी स्पष्ट केलं.

Disclaimer

Disclaimer

This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt Publisher: Sarkarnama

#Hashtags